चिखली:- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली, जि. बुलडाणा द्वारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे अकोट येथील वृध्द महिलेस मिळाला आश्रय.
सविस्तर असे की, श्रीमती उषा शाहदेव दुतोंडे रा. ५७ एलीचपुर वेस, अकोट जिल्हा अकोला येथील रहिवाशी असून त्या निराधार बेसहारा असल्यामुळे त्या भिक्षा मागत अमडापुर येथे आल्या त्यामुळे येथील सामाजीक कार्यकते अक्षय लक्ष्मण आदबाने, गजानन विठ्ठलराव सुर्यवंशी, सुरज अरुण गायकवाड, मंगेश माधव इंगळे यांनी पुर्ण विचारपुस केली असता मुलगा संभाळत नाही मारझोड करतो घरी राहु देत नाही अतोनात हालअपेष्टा करतो मला आश्रमात नेऊन सोडा असे सांगीतले त्यावरुन त्यांनी गोदरीचे सरपंच भरत जोगदंडे यांच्याशी संपर्क साधुन सदर वृध्द महिलेची माहिती दिली त्यानुसार त्यांनी तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाचे संचालक प्रशांतभैया डोंगरदिवे यांना संपर्क साधला असता सदर वृध्दमहिलेस आश्रमात आश्रय देण्याची विनंती केल्यानुसार त्या वृध्द महिलेचे जवळचे नातेवाईकांचा संपर्क नसल्याने चिखली पोलीस स्टेशन मधे नोंद घेऊन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात पो. हे. काॅ. संतोष शेळके, पो. काॅ.प्रशांत धंदर यांच्या सहकार्याने अक्षय लक्ष्मण आदबाने, गजानन विठ्ठलराव सुर्यवंशी, सुरज अरुण गायकवाड, मंगेश माधव इंगळे यांनी तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे प्रवेशित करण्यात आले. यावेळी प्रशांतभैया डोंगरदिवे व सौ रुपाली डोंगरदिवे यांनी तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाच्या वतीने सदर वृध्द महिलेची जबाबदारी स्विकारली यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.