नांदगांव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित मदन महाराज विद्यालय व कमलदीप कनिष्ठ महाविद्यालय फुलआमला पं.स. नांदगाव खंडेश्वर येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानातील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शाळेने सहभाग घेतलेला होता.
महाराष्ट्र राज्य शासनाव्दारे यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हि स्पर्धा राबवली जात आहे यामधे राज्यस्तरीय बक्षीस 51 लक्ष जिल्हास्तरीय 11 लक्ष व तालुकास्तरीय 3 लक्ष असून शाळा ही सर्व निकष पुर्ण करीत असल्यामुळें तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तसेच यापुढे जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
या यशासाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य श्री.निलेश देशमुख यांच्या मार्गद्शनाखाली नियोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्रा. श्री. गाडबैल सर , प्रा.श्री.पाटील सर , प्रा.श्री.राठोड सर विद्यालयाचे शिक्षक श्री.अवझाडे सर श्री.कवाणे सर श्री.विधळे सर श्री.कांहेरकर सर श्री बागेकर सर चेंडाळने मॅडम श्री गिरी सर श्री.नाखले भाऊ श्री. सुरेंद्र मोहोड श्री शाहबाज लालुवाले सर्व विद्यार्थि पालक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावातील नागरिक यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या अध्यक्षा आदरणिय किर्ती ताई अर्जून, साचिव डॉ.राव सर, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन पंडित सर तसेच पंचक्रोशीतून शुभेछाचां वर्षाव होत आहे